प्रा.डॉ. नागन्नाथ घोरपडे यांच्यामुळे निराधारांची दिपावली गोड
शिरभावी प्रतिनिधी
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा!! या संत तुकाराम महाराजांच्या प्रसिद्ध उक्तीला साध्य करत भाजपा पदवीधर प्रकोष्ठचे सोलापूर ( ग्रामीण ) जिल्हा संयोजक प्रा.डॉ. नागन्नाथ घोरपडे यांच्यातर्फे सांगोला तालुक्यातील व आसपासच्या परिसरातील १५ निराधार कुटुंबांना व सांगोला येथील मातोश्री वृद्धाश्रम सांगोला यांना दिपावलीनिमित्त किराणा सामानाचे किट भेट देण्यात आले.
दिपावलीचा आनंद प्रत्येक जण आपल्या परीने साजरा करीत असतो. दिपावली ही नवचैतन्याची प्रकाशाची गोड धोड खाऊ खाण्याची दिपावली हीच दिपावली ची ओळख आहे. पण आजही अनेक लोक आहेत की त्यांना त्यांच्या परिस्थितीमुळे दिपावली सण साजरा करणे मुश्किलच आहे. सर्वत्र दिपावली साजरी होत असताना समाजातील निराधार, गरीब कुटुंब मात्र या आनंदापासून दूर असतात. तेव्हा सण वार हे सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन सण साजरे करावे याचीच प्रेरणा देतात. हीच प्रेरणा घेऊन प्रकाशाच्या उत्सवाला सामाजिक बांधिलकीचे कोंदण देण्याचा प्रयत्न केला आहे.भाजपा पदवीधर प्रकोष्ठचे सोलापूर ( ग्रामीण ) जिल्हा संयोजक प्रा.डॉ. नागन्नाथ घोरपडे यांच्यातर्फे सांगोला तालुक्यातील व आसपासच्या परिसरातील वंचित, निराधार, गरीब अशा १५ निराधार कुटुंबांना १६३९ रुपये प्रति कीट प्रमाणे मोफत किराणा सामानाचे किट वाटप करण्यात आले. या किटमध्ये साखर ५ किलो, हरभरा डाळ ५ किलो, तेल ५ किलो, गरा ( रवा ) ५ किलो, मोती साबण, सुगंधी उटणे या सामानाचा यामध्ये समावेश होता. तसेच त्यांनी लोकसेवा बहुउद्देशीय संस्था कडलास ( सावंतवाडी ) संचलित मातोश्री वृद्धाश्रम सांगोला या ठिकाणी भेट देऊन त्यांनी वृद्धाश्रमातील आजी आजोबांनाही दिपावली साजरी करता यावी या भावनेतून दिपावलीसाठी आवश्यक असलेल्या किराणा साहित्याची भेट दिली. यावेळी या ठिकाणी मातोश्री वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष राहुल जाधव, जिल्हा संयोजक प्रा.डॉ. नागन्नाथ घोरपडे, बापू देवकते तसेच वृद्धाश्रमातील सर्व सदस्य उपस्थित होते.
यानंतर जिल्हा संयोजक प्रा.डॉ. नागन्नाथ घोरपडे यांनी याविषयी बोलताना सांगितले की घराघरात दिपावलीचा उत्सव साजरा होत असताना समाजातील अनेक घटक असे आहेत की त्यांना दसरा काय आणि दिवाळी काय? एक सारखीच हातात पैसा नसताना करणार तरी काय? रोज मोलमजुरी करून आपल्या आणि लेकरांच्या पोटाची खळगी भरणाऱ्या गरजवंतांच्या चेहऱ्यावर या सणाचा गोडवा पाहायला मिळावा असे अनेकांना वाटते. परंतु कृतीतून तिथपर्यंत पोहोचून त्यांना काहीसा का होईना आनंद मिळावे यासाठी मी माझ्या वतीने समाजातील गोरगरीब, वंचित, निराधार कुटुंबांना वृद्धाश्रमास भेट देऊन दिपावलीचे किराणा किट भेट दिले. या अनपेक्षित पणे मिळालेल्या या भेटीमुळे त्यांचा दिपावलीचा आनंद द्विगुणीत झाला. या लोकांना अव्याहतपणे मदत करणे यापेक्षा मला मोठी दिपावली नाही असे मनोगत भाजपा पदवीधर प्रकोष्ठचे सोलापूर ( ग्रामीण ) जिल्हा संयोजक प्रा.डॉ. नागन्नाथ घोरपडे यांनी व्यक्त केले.