नवी मुंबई प्रतिनिधी सुभाष हांडे देशमुख
नवी मुंबई . नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक संघ समाज हिताच्या दृष्टीने विविध उपक्रमांद्वारे अविरत कार्यरत आहे. समाजातील वंचित घटक आणि गरजवंत घटकांबाबत नेहमीच संघाचे स्वयंसेवक संवेदशील राहून जबाबदारीने काम करत असतात. आणि वेळोवेळी विविध स्वरुपातील मदत प्रत्यक्ष जाऊन करीत असतात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणजे धन्वंतरी जयंती चे औचित्य साधून दिनांक १० नोव्हेंबर २०२३ रोजी नवी मुंबईतील सानपाडा येथील वात्सल्य ट्रस्ट मधील वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रम मधील महिला आणि मुलींना दिवाळी फराळाचे वाटप करुन त्यांचीही दिवाळी आनंदी करण्याचा केलेला वास्तव प्रयत्न. आणि यात ते यशस्वीही झाले, हे त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि त्यांना झालेला आनंद पाहून अधोरेखित झाले.
या उपक्रमात नेरुळ ज्येष्ठ नागरिक संघाच्या सर्वश्री अरविंद वाळवेकर, प्रभाकर गुमास्ते, दीपक दिघे, रणजित दिक्षित, विकास साठे, अजय माढेकर, दत्ताराम आंब्रे, रमेश गायकवाड, सुनिल आचरेकर, श्रीमती सुचित्रा कुंचमवार, श्रीमती रजनी कलोसे, श्रीमती निर्मला शिंदे, श्रीमती कल्पना मोहिते आधी सभासदांनी सहयोग दिला आणि कार्यक्रम यशस्वी केला.