पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विवेक वर्धिनीच्या ज्युनिअर कॉलेज पंढरपूर तसेच श्री दत्त विद्यामंदिर सुस्ते विवेक पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय पंढरपूर येथील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या साठी मुंबई अँटी करप्शन चे डी.आय.जी संदीप दिवाण यांचे मार्गदर्शन आयोजित केले होते.
यावेळी त्यांनी शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील शिल्पकार असून त्यांच्या हातून घडणारे विद्यार्थी हे समाजात आदर्श कसे घडतील यासाठी सातत्याने शिक्षकांनी प्रयत्न करावा तसेच शालेय कामकाजात तंत्रज्ञानाचा प्रभावी करावा जेणेकरून आपला विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागे पडणार नाही यासाठी शिक्षकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे तसेच कोणत्याही गुन्हेगारीपासून विद्यार्थ्यांना वाचवायचे असेल तर त्यांचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे हे गरजेचे असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनास सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रशालेचे प्राचार्य डॉ. मुंढे यु. आर.यांनी केले प्रस्ताविकात त्यांनी प्रशालेमध्ये व ज्युनिअर कॉलेज या ठिकाणी केलेल्या डिजिटल सुविधा विषयी व प्रशालाआणि कॉलेजमधील विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच शासन ज्या ज्या योजना जाहीर करत आहे त्यापूर्वी आम्ही विद्यालयांमध्ये व कॉलेजमध्ये या सुविधा अगोदरपासूनच पूर्ण केल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी संदीप दिवाण यांनी शिक्षकांशी विविध विषयावर हितगुज करून विविध प्रश्नांची माहिती दिली व कॉलेजमधील सर्व सुविधांची पाहणी करून समाधान व्यक्त केले व अशा प्रकारचे कॉलेज व प्रशाला ही एक आदर्श असल्याने त्यांनी सांगितले. यानंतर रेडिओ स्टार दिलीप टोमके यांनी उपस्थितांना आपल्या गायनातून उपदेश केला.
यावेळी व्यासपीठावर सौ दिवाण , सौ .टोमके ,संस्थेचे अध्यक्ष डॉ. मदनजी क्षीरसागर , सचिव ॲड. वैभव टोमके , तसेच उपप्राचार्य शिंदे ई.जी.दत्त विद्यामंदिर चे प्राचार्य कटकधोंड ,प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ अटकळे , विवेक वर्धिनी चे पर्यवेक्षक पवार ए.ए., विभाग प्रमुख चौगुले , दत्त विद्यामंदिर सुस्ते पर्यवेक्षक कट्टे सर, ढगे सर तसेच सर्व विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितोळे मॅडम यांनी केले तर आभार उपप्राचार्य शिंदे यांनी केले मानले.
यावेळी आधुनिक तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर या विषयावर प्रशालेतील शिक्षक कुंभार , दिनकर सर, आलाट सर यांनी सर्व शिक्षकांना गुगल चा अध्यापनात वापर तसेच दाताऱ सॉफ्टवेअर इत्यादी विषयी सखोल माहिती दिली.


