अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळून घेऊन गेल्याबद्दल आरोपी नागेश उर्फ अमोल प्रल्हाद अंध्याल (रा.सोलापूर) यास मे.विशेष न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी जामीन मंजूर केला.
यात हकीकत अशी की दि. 20/07/2023 रोजी फिर्यादीने जेलरोड पोलीस स्टेशन अंतर्गत दोन अज्ञात इसमां विरुद्ध भा.द.वी कलम 354, 363 ,366, 341, 506, 34 व सहकलम 8,12 बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम(pocso Act) 2012 गुन्हा दाखल केला. यातील पिडितां कन्ना चौक येथून निळकंठेश्वर प्रशाला येथे जात असताना वरील आरोपींनी यातील पिडितांना जबरदस्तीने फुस लावून लग्न करण्याच्या उद्देशाने राघवेंद्र मंदिर जवळ, रेणुका नगर ,जुनी विडी घरकुल सोलापूर येथे घेऊन जाऊन अपहरण केले असा आरोप होता. तरी वरील प्रकरणात आरोपींना अटक झाली होती. त्यानंतर आरोपींनी आपला जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता.
सदर प्रकरणात आरोपी तर्फ ॲड. कदीर औटी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मे. विशेष न्यायालयाने आरोपी नागेश उर्फ अमोल प्रल्हाद अंध्याल याचा जामीन मंजूर केला आहे .यात प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी,ॲड. दत्तात्रेय कापुरे, ॲड. फैयाज शेख व ॲड. सोहेल रामपुरे यांनी काम पाहिले.