जोगेशवरी प्रतिनिधी उदय वाघवणकर
शिवसेना नेते व आमदार रविंद्र वायकर यांच्या कार्याने प्रेरित होऊन शिवसेना शाखा क्र. ७८ चे उपशाखाप्रमुख युसुफ दुल्हारे व महिला उपशाखा संघटक परवीन युसुफ दुल्हारे यांच्या आयोजनाखाली 'एक दिपावली हिंदू मुस्लिम बांधवांसोबत' हा कार्यक्रम दि. १२ नोव्हेंबर रोजी सायं ०६ वाजता ईदगाह मैदान येथे आयोजित करण्यात आला होता.
सदर प्रसंगी तब्बल १०० हून अधिक हिंदू - मुस्लिम नागरिकांना मिठाई व भेटवस्तू देऊन त्यांना ब्लू स्काय ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी अनिल म्हसकर लोकमान्य कट्टा प्रमुख, महेश पडवळ शाखा समन्वयक प्रभाग क्र. ७८ व ग्राहक संरक्षण कक्ष उपविभाग संघटक, संजय महाडिक उपशाखाप्रमुख, नुरुल शेख , उपशाखाप्रमुख, सईद कादरी ग्राहक संरक्षण कक्ष वार्ड संघटक, निलेश बोबडे सोशल मीडिया समन्वयक, रफिया टीचर शिवसैनिक, राबिया, माजिद, हुसेन भाई तसेच मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.