सोलापूर प्रतिनिधी
सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचे डॉजबॉल स्पर्धेत उत्तुंग यश सोलापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा कार्यालय संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या
शहरस्तरीय स्पर्धेत श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या मुलांच्या व मुलींच्या संघाने घवघवीत यश संपादन केले
१७ वर्षाखालील मुले द्वितीय,हर्षवर्धन कुडगुंटे, गंगाधर सुरमपल्ली, आदित्य अनंतुल, व्यंकटेश गुणके, तनिष लवटे, आदित्य महांकाळ, एकलव्य भोंगे, भरत श्रीराम, आदित्य मलखेड, पियुष बावी
नवरात्र विशेष
नाशिक येथील नमस्ते फाउंडेशनचा महीलाचा ग्रुप फोटो.फोटो - स्नेहल देव,नाशिक
--------------------------------------------------------------
१९ वर्षा खालील मुले तृतीयम.जैद नदाफ,ऋतुराज जाधव, आदित्य कलबुर्गी, उत्कर्ष कैरमकोंडा, रेहान चडचणकर, अवधूत कांबळे, अंशुमन बेलकोटे, कृष्णा मुळूक, साकल्य चव्हाण, उदय गव्हाणे, गणेश ककमारे
१९ वर्षाखालील मुली तृतीय नंदिता नंदुरकर, अमृता शृंगारपुरे रुक्मिणी मुगळे, मिताली पाटील, अनुष्का हत्तर संग, वैष्णवी लोंढे, सायली दंदाडे, ऋतुजा भोई, कनक साखरे, मधुरा कलशेट्टी या सर्व विद्यार्थ्यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले.ही स्पर्धा राजीव गांधी स्टेडियम सोलापूर येथे पार पडली.
या सुयशाबद्दल श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुलाचे चेअरमन श्री धर्मराज काडादी तसेच श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे सदस्य डॉ. राजशेखर येळीकर, श्री भीमाशंकर पटणे, श्री गुरुराज माळगे, श्री. मल्लिकार्जुन कळके व समन्वयक श्री संतोष पाटील, शाळेचे मुख्याध्यापक श्री योगेश राऊत पर्यवेक्षक श्री शिवराज बिराजदार व सर्व शिक्षक वृंद यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विजेत्या खेळाडूंना क्रिडाशिक्षक श्री पवन भोसले यांनी मार्गदर्शन केले.