सोलापूर प्रतिनिधी
वाराणसी उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या ८ व्या सब ज्युनिअर डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य डॉजबॉल मुलींच्या संघात श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलची विद्यार्थिनी कु. नंदिता विक्रम नंदुरकर हिची निवड झाली आहे. सदर स्पर्धेचे प्रशिक्षण शिबिर २९ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर रोजी होणार असून सदर स्पर्धा १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
सदर स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुलाचे चेअरमन श्री धर्मराज काडादी तसेच श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे सदस्य डॉ. राजशेखर येळीकर,श्री भीमाशंकर पटणे, श्री गुरुराज माळगे, श्री. मल्लिकार्जुन कळके व समन्वयक श्री संतोष पाटील,शाळेचे मुख्याध्यापक श्री योगेश राऊत, पर्यवेक्षक श्री शिवराज बिराजदार व सर्व शिक्षक वृंद यांनी तिचे अभिनंदन केले.
निवड झालेल्या खेळाडूला क्रीडाशिक्षक श्री पवन भोसले यांनी मार्गदर्शन केले.