छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या प्रमुख पदाधिकारी यांची बैठक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी गृहमंत्री बाळा नांदगावकर आणि मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी नगर शहरातील सुभेदारी या शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आली होती.
यावेळी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.
छत्रपती संभाजी नगर लोकसभा निवडणूक तयारीसाठी आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, दिलीप बनकर, वैभव मिटकर, राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, दिलीप चितलांगे, महानगराध्यक्ष बिपीन नाईक, शहराध्यक्ष आशिष सुरडकर, विद्यार्थी सेनेचे प्रदेश सरचिटणीस राजू जावळेकर, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष मंगेश साळवे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष मनोज पुंडेकर, जिल्हा सचिव अनिकेत निलावार, एकलव्य फाउंडेशनचे अध्यक्ष सृष्टी नांदगावकर, महाराष्ट्र सैनिक अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी इत्यादी उपस्थित होते.