रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा
बारामती प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, श्रीकांत फाउंडेशनचे अध्यक्ष खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री कार्यालयाचे OSD मंगेश चिवटे, मुख्यमंत्री कार्यालयाचे कक्ष प्रमुख राम हरी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जनाबाई तळेकर वय वय 73 वर्ष राहणार जळोची तालुका बारामती जिल्हा पुणे या पेशंटला खुब्याच्या बॉलचे ऑपरेशन करायला तेथील आर्थोपेडिक तज्ञ डॉक्टरांनी वरील पेशंटचे सर्व तपासणी केल्यानंतर सांगितले होते परंतु पेशंटचे आर्थिक परिस्थिती अतिशय हलकीचे असल्या कारणाने ते त्यांना बरेच दिवस शक्य झाले नव्हते
परंतु त्यांनी जळूची गावातीलच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे नवीन पदाधिकारी निर्मलाताई जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लागलीच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे उपजिल्हा समन्वयक सतीश महादेव गावडे यांच्याशी 98 500 202 74 या संपर्क क्रमांकावरून त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बारामतीतील तज्ञ डॉ .अमोल भंडारे आर्थोपेडिक तज्ञ यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या पेशंट संदर्भात संपूर्ण कल्पना दिली असता त्यांनी वरील पेशंटचे खुब्याच्या बॉलचे ऑपरेशन महात्मा ज्योतिबा फुले या योजनेतून अतिशय उत्कृष्टपणे यशस्वीरित्या ऑपरेशन करून दिले त्याबद्दल पेशंटच्या नातेवाईकांनी वरील मान्यवरांचे व तेथील डॉक्टरांचे हॉस्पिटलच्या स्टॉप चे व तात्काळ व वेळेत मदत केली.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे उपजिल्हा समन्वयक सतीश गावडे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे निर्मलाताई जगताप ,पुष्पांजली जडे ,कल्पनाताई जाधव, संगीता जायभये ,राजेंद्र नागरगोजे ,महेश केदार ,संदीप पोमणे , संतोष नाळे , श्रेयश भोसले व बारामती वैद्यकीय मदत कक्षाचे सर्व पदाधिकारी यांचे पेशंटच्या नातेवाईकांनी तोंड भरून कौतुक करून अभिनंदन केले.