पंढरपूर प्रतिनिधी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत मिट्टी को नमन और वीरो को वंदन हे अभियान संपूर्ण देशात व राज्यांमध्ये राबविण्यात येत असून राज्यामधील गावापासून प्रत्येक शहरापर्यंत आपल्या माती विषयी जनजागृती प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी व या मातृभूमीसाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीरांचा सन्मान व्हावा या हेतूने केंद्र व राज्य शासनाने हे अभियान हाती घेतले आहे या कामी अमृत कलश संपूर्ण शहरातून प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यात येत असून या कामी आज नगर परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक गोपाळ कृष्ण मंदिर नामदेव पायरी व पुन्हा पश्चिम द्वार चौफळा मार्गे राष्ट्रमाता जिजामाता उद्यान हुतात्मा स्मारक पर्यंत भव्य रॅली चे आयोजन केले होते शहरातून रॅली निघाल्यानंतर याचा समारोप हुतात्मा स्मारक येथे करण्यात आला.
यावेळी हुतात्मा भगतसिंग व शहिदांचे स्मारक यांचे पूजन मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या शुभहस्ते उपमुख्याधिकारी अँड.सुनील वाळूजकर पंढरपूर नगर परिषदेचे माजी उपनराध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक अनिल अभंगराव, भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक विक्रम शिरसट, माजी नगरसेवक डी राज सर्वगोड, नवनाथ रानगट,विवेक परदेशी,सामजिक कार्यकर्ते धर्मराज घोडके,नरेंद्र डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
यावेळी कार्यालय अधीक्षक जानबा कांबळे,नगर अभियंता प्रवीण बैले, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे समन्वयक बोंडरे गुरुजी, कर अधिकारी सुप्रिया शिंदे, जनसंपर्क अधिकारी अस्मिता निकम, मुख्य लेखापाल अभिलाषा नेरे, राजकुमार सपाटे, सुहास झिंगे,संतोष शिरसागर, राजकुमार काळे प्रीतम येळे दर्शन वेळापुरे चिदानंद सर्वगोड, अनिल अभंगराव ऋषी अधटराव तनुजा सिताफ हे उपस्थितीत होते.
तसेच या रॅली मध्ये पंढरपूर शहरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांचे विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, महिला बचत गट, आपटे उपलब्ध प्रशाला यांचे बँड पथक व लोकमान्य विद्यालयाचे एनसीसी पथक नागरीक, सामाजिक व राजकीय संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.