सोलापूर प्रतिनिधी
बुधवार दिनांक ५ ऑक्टोबर 2023 रोजी सिद्धेश्वर कन्या प्रशाला येथे दंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .सदर शिबिर हे सिद्धेश्वर कन्या प्रशाला पालक शिक्षक ,संघ लायन्स क्लब सोलापूर व पंडित दीनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालय, केगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संतोष पाटील समन्वयक ,सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समिती तथा मुख्याध्यापक सिद्धेश्वर प्रशाला सोलापूर यांनी भूषविले. सिद्धेश्वर कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका संगीता गोटे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले तसेच त्यांचा सत्कार केला .
याप्रसंगी सिद्धेश्वर कन्या प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी कुमारी नीता आळंगे HOD,IT Dept., सिद्धेश्वर वुमेन्स पोलिटेकनिक कॉलेज यांनी पीएचडी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार सिद्धेश्वर कन्या प्रशाले तर्फे करण्यात आला .
अध्यक्षीय मनोगतात पाटील यांनी सिद्धेश्वर कन्या प्रशालेत अनेकविध उपक्रम सुरू असतात व अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडत असतो असे म्हणून शिक्षकांचे व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमास लायन्स क्लब ऑफ सोलापूरचे प्रेसिडेंट्स रवीकरण वायचळ , प्रभाकर जवळकर, गणेश दंतकाळे , सोमशेखर भोगडे औदप्पा पुजारी त्याचबरोबर पंडित दीनदयाळ उपाध्याय डेंटल कॉलेजच्या डॉ.मीना काशेट्टी प्रशालेच्या मुख्याध्यापिका संगीता गोटे, प्रशालेच्या पर्यवेक्षका सुनिता वाले, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सुभाष माळी, ज्येष्ठ क्रीडा शिक्षिका .मंदाकिनी मणूरे ज्येष्ठ शिक्षक प्रभू कांबळे तसेच सांस्कृतिक प्रमुख .अश्विनी कुलकर्णी सहप्रमुख सुनीता मिठारी हे उपस्थित होते.
याप्रसंगी डॉक्टर मीना काशेट्टी यांनी विद्यार्थिनींना दाताचे आरोग्य चांगले राखण्याबाबत रीतसर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षिका वाले यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी कुलकर्णी यांनी केले.