पुणे प्रतिनिधी सुभाष मुळे
जॉय सामाजिक संस्था मुंबई या महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य संस्थेला भगवे वादळ या साप्ताहिक वर्तमान पत्राच्या द्वितीय वर्धापन दिना निमित्तने संत गाडगेबाबा आदर्श सेवाभावी संस्था पुरस्कार भगवे वादळ चे संपादक दत्ता खंदारे यांनी जाहीर केला आहे.येत्या ५ नोव्हेंबर रोजी दादर येथे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत जॉय संस्थेला पुरस्कार देण्यात येणार असल्याचे खंदारे म्हणाले. मागील काही वर्षात जॉय संस्थेने उल्लेखनीय काम केले असून विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वानाच मदतीचा हात दिलेला आहे.
कारोना काळात तर संस्थेने अग्रेसर राहून खूप प्रेरणादायी काम केलं होत व सर्वांनीच जॉय च्या कामाची दखल घेतली होती.जॉय चे सेवाभावी कार्यक्रम वर्षभर सुरूच असतात व या कामासाठी संस्थेचे सभासद, पदाधिकारी नेहमीच पुढाकार घेऊन सढळ हस्ते सहकार्य करतात आणि समाजातील दानशूर मान्यवर देखील वेळोवेळी आमच्या उपक्रमांना मदत करीत असल्याने एकप्रकारे प्रत्येकाचाच या समाजकार्यात खारीचा वाटा असतो आणि त्यामुळे सर्वांनाच आनंद व समाधान मिळते असे जॉय चे अध्यक्ष गणेश हिरवे सांगतात. यापूर्वीही ही जॉय च्या सेवाभावी कामाची दखल घेत संस्थेला अनेकांनी गौरविले आहे.
जॉय संस्थेचे काम खरंच खूप छान असल्याचे अनेक मान्यवरांनी वेळोवेळी बोलून दाखविले आहे.भगवे वादळ साप्ताहिकाच्या वतीने जॉय संस्थेला जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारामुळे अनेकांनी संस्थेचे मनापासून अभिनंदन केले असून शुभेच्छा दिल्या आहेत.