पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत यातील फिर्यादीची जैनवाडी शिवारात वडीलोपार्जित शेती गट नंबर 121, 119 असा शेती गट असुन त्याची वाटणीबाबत फिर्यादी व त्याचा सख्खा भाऊ तुकाराम नामदेव जाधव यांचेमध्ये वाद चालू असून या शेतीच्या वादातुनच त्यांचेत व फिर्यादीमध्ये फौजदारी तसेच दिवाणी स्वरुपाचा वाद आहेत. त्यांच्या परस्पर विरुद्ध चालू असलेल्या फौजदारी केसच्या तारखा कोर्टात चालु असून सदर तारखेला दि. 04/10/2023 रोजी यातील फिर्यादीची मुले महेश जाधव व सुग्रीव जाधव हजर राहुन मोटारसायकलवर पंढरपूर येथून गावी जैनवाडी येथे परत येत असताना महेश गाडी चालवत असलेल्या व पाठीमागे सुग्रीव जाधव बसलेल्या मोटारसायकल क्रमांक MH 13 AQ 5875 ला त्यांना जिवे मारण्याचे उद्देशाने पिक अप MH 12 QW 8597 चा चालक यातील आरोपी नाव अंकुश तुकाराम जाधव व त्याचे सोबत असलेले यातील आरोपी संतोष तुकाराम जाधव, सचिन मनोहर लिंगडे सर्व रा. जैनवाडी ता. पंढरपुर यांनी संगणमताने त्यांचा पाठलाग करून निर्जन ठिकाणी आल्यानंतर त्यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने अचानक मोटारसायकलला पाठीमागुन धडक देवून मोटारसायकल अडकलेल्या व त्यावर वरील दोघे बसलेल्या स्थितीत ढकलत अंदाजे शंभर ते दिडशे मिटर जिवे ठार मारण्याचे उद्देशाने फरफटत नेवुन खाली पाडुन गंभीर जखमी केले व त्यांचे मदतीला लोक येत आहेत हे पाहून पळून गेले वरील आरोपीनी फिर्यादीचे मुलांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे म्हणुन वगैरे मजकुरच्या फिर्यादीवरुन पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं 484/2023 भा.द.वि. कलम 307.34 आर्म ऑक्ट 4,25 सह म.पो.अधि. कलम 135 प्रमाणे गुन्हा रजिष्टर मध्ये दाखल करण्यात आला होता. यातील जखमी सुग्रीव ज्ञानोबा जाधव हा उपचार चालू असताना मयत झाला असल्याने सदर गुन्हयात वाढीव भा.द.वि. कलम 302 लावण्यात आले होते.
सदर गुन्हयातील आरोपींचे शोधकामी पोलीस ठाणे पंढरपुर ग्रामीण व पोलीस ठाणे पंढरपुर शहरकडील पोलीस पथके नेमण्यात आली होती. सदर गुन्हयाचा कौशल्यपूर्ण तपास करून सदर गुन्हयातील दोन आरोपी नामे 1) संतोष तुकाराम जाधव वय 42 वर्षे 2) सचिन मनोहर लिंगडे वय 38 वर्षे दोघे रा. जैनवाडी ता. पंढरपुर यांना मौजे कंदर ता. करमाळा व मौजे, जैनवाडी ता. पंढरपुर येथून ताब्यात घेवुन त्यांना दि. 05/10/2023 रोजी अटक करण्यात आली होती. सदर आरोपी हे सध्या पोलीस कोठडी रिमांड मध्ये आहेत. यातील मुख्य आरोपी अंकुश तुकाराम जाधव हा गुन्हा घडलेपासून फरार होता. आज रोजी दि.07/10 /2023 रोजी सदर गुन्हयातील आरोपी नामे अंकुश तुकाराम जाधव रा. जैनवाडी ता.पंढरपुर हा त्याचे शेतात मकेच्या पिकात लपले बाबत माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणेकडील तपास पथक पाठवून मक्याचे पिकामध्ये शोध घेतला असता तो सदर ठिकाणाहून पळुन जात असताना त्यास पाठलाग करुन शिताफिने पकडले असुन त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, सोलापुर ग्रामीण, मा. अप्पर पोलीस अधिक्षक हिमंत जाधव सोलापुर ग्रामीण, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले पंढरपुर विभाग पंढरपुर याचे मार्गदर्शनाखाली पंढरपुर शहर पोलीस ठाणे कडील डी. बी. पथक व पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणेकडील सपो फों संतोष जगताप, सोफा सुभाष शेंडगे, पोना सुरेश माळी, पोहेकॉ राहुल शिंदे यांनी केली असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक शिरीष हुबे हे करीत आहेत.