पंढरपूर प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये २ ऑक्टोबर २०२३ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असल्याची माहिती उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्ञी यांच्या प्रतिमेचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, अधिष्ठिता डाॅ. संपत देशमुख, विनायक माळी, नागेंद्रकुमार नायकुडे यांच्या हस्ते पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
या दरम्यान सतिश नवले, दादासो बनसोडे, सिताराम मासाळ, मच्छिंद्र भुसनर, एनएसएस क्लब अध्यक्ष नागेंद्रकुमार नायकुडे, एनएसएस क्लब सेक्रेटरी अथर्व कुराडे, एनएसएस प्रतिनिधी अनुप नायकल, श्रद्धा पंधे आदींसह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारीवर्ग उपस्थित राहून अभिवादन केले.