चला सर्वजण एकत्र येऊया, हा सगळा परिसर स्वच्छ करूया...स्वच्छता आहे एक महाअभियान, चला देऊया आपल्या सर्वांचे योगदान.
मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
स्वच्छता हिच सेवा या मोहीमे अंतर्गत दि. २ ऑक्टोबर २०२३ रोजी महात्मा गांधी जयंती निमित्ताने माजी नगरसेविका संगीता सुतार, विधान सभा निरीक्षक संजय सुतार, विभाग प्रमुख अजित भंडारी यांच्या मार्गर्शनाखाली स्वच्छता मोहिमेचे आयोजन..
मढ वेलफेअर असोसिएशन चे सदस्य, रोटरी मुंबई वेस्ट कॉस्ट च्या अध्यक्ष डॉ. राखी धोत्रे, सचिव नागराज शेट्टी, सदस्य रेश्मी महाजन आणि गणेश कदम
यांच्या नेतृत्वाखाली स्लिवर बिच, मढ (मालाड पश्चिम) येथे स्वच्छता मोहीम राबवून महात्मा गांधी यांना स्वच्छंlजली अर्पण करण्यात आली. यावेळी रोटरेक्ट क्लब ऑफ मुंबई स्काय सिटी, डिस्ट्रिक्ट ३१४१ चे समन्वयक सदस्य प्राजक्ता सवरणकर, प्रणाली भिंगे, अंजली जैन, उदय विचले, लावण्या दुम्पति आणि महिला व पुरुष पदाधिकारी तसेच अनेक कार्यकर्ते, यांनी यात सक्रिय सहभाग घेतला.
रोटरी क्लब, वालिया कॉलेज एनएसएस टीम, क्लारस कॉलेजचे विद्यार्थी आणि संत बोनाव्हेंचर हायस्कूलचे विद्यार्थीने स्वच्छता मोहिमेत घेतला सहभाग... आणि कलाकार, दिग्दर्शक परमीत शेट्टी देखील यावेळी स्वच्छतेसाठी उपस्थित होते.
या मोहिमेद्वारे आम्ही सर्वसमावेशक स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले आणि भारताला कचरामुक्त करण्यासाठी या समुदायाने लहानात लहान योगदान देण्यास प्रवृत्त होण्यासाठी प्रत्येका समोर एक उदाहरण ठेवले आहे, कारण प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा आहे.