सोलापूर प्रतिनिधी
मोफत दंत आरोग्य सदर शिबीर लायन्स क्लब सोलापूर सिटी, पंडित दीनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालय, केगाव. दंत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दर्शन गारमेंट येथे आयोजित केले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय उपप्रांतपाल लायन मल्लीनाथ पाटील यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे रिजन चेअरमन लायन राजेंद्र शहा, लायन श्रीकांत सोनी, श्री राजेंद्र शालघर, चनबसू माळगे, या नगरसेवक बापु ढगे लायन मोहन भुमकर अध्यक्ष यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. तसेच .अध्यक्षीय भाषणात क्लबचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिले. कार्यक्रमास त्याचबरोबर पंडित दीनदयाळ उपाध्याय डेंटल कॉलेजच्या डॉक्टर मीना काशेट्टी त्यांचे सर्व सहकारी डॉक्टर टीम, दर्शन गारमेंट मधील कामगार व एमआयडीसी एरिया मधील नागरिक आरोग्य शिबिरात जवळजवळ १७० तपासणी करून घेतले.
याप्रसंगी डॉक्टर मीना काशेट्टी यांनी कामगारांना, नागरीकांना दाताचे आरोग्य चांगले राखण्याबाबत रीतसर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभार लायन डॉ माधुरी अवसेकर यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ संध्या शृंगारपुरे यांनी केले.