वाडी कुरोली प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोली गावची कन्या प्रीती अशोक काळे हिची 12 ते 15 ऑक्टोबर 2023 या कालावधीत मलेशिया या देशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय खो-खो टेस्ट सिरीज साठी भारतीय संघात निवड झाली आहे. भारतीय संघाकडून खेळणारी या गावातीलच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील पहिली महिला खेळाडू म्हणून प्रीतीची ही निवड ऐतिहासिक मानली जात आहे. वाडीकुरोलीच्या वसंतराव काळे प्रशालेची विद्यार्थिनी ते आंतरराष्ट्रीय खो- खो खेळाडू हा तिचा प्रवास थक्क करणारा आहे .
श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी प्रीतीला सुरवातीला दिलेलं पाठबळ,शाळेतील प्रशिक्षक शिक्षकांना दिलेली प्रेरणा व ग्रामीण भागात खेळासाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधा यामुळेच आज वसंतदादांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण होताना दिसत आहेत.वाडीकुरोली शाळेच्या मैदानावर 2016 साली खो- खो ची सुरुवात करत असताना प्रशिक्षकांनी पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण होत आहे.
समस्थ वाडीकुरोलीकरांच्या वतीने प्रीतीचे मनःपूर्वक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.