सह धर्मादाय आयुक्त, पुणे सुधीर बुक्के व महाराष्ट्र अस्थिरोग संघटना यांच्यावर तातडीने कारवाई करण्याबाबत तक्रार.
सोलापूर प्रतिनिधी
सह धर्मादाय आयुक्त, पुणे श्री सुधीर बुक्के यांच्यावर जाणून बुजून महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेवर कारवाई न केल्याबद्दल व त्यांच्या विक्षिप्त वागण्याबद्दल व महाराष्ट्र अस्थिरोग संघटना तात्काळ बरखास्त करून मोओकॉन 2023 , जळगाव कॉन्फरन्स तात्काळ बंद करून सर्व पदाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराबाबत कारवाई करण्यासाठी संघटनेचेच अस्थिरोगतज्ञ डॉ.संदीप आडके,सोलापूर यांनी तातडीच्या मेल द्वारे मुख्य न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालय, मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, धर्मादाय आयुक्त , न्याय व विधी खाते मंत्रालय ,यांच्याकडे केली आहे. डॉ. आडके यांनी महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेतील पदाधिकारी वर्षांनुवर्षे जो भ्रष्टाचार करीत आहेत त्याबाबत वाचा फोडल्यामुळे त्यांना संघटनेतून अनधिकृतपणे काढून टाकले होते. या सर्व बाबतीत दि. 23/9/21 रोजी रोजी 41/ड कलमांतर्गत सह धर्मादाय आयुक्त ,पुणे श्री सुधीर बुक्के यांच्याकडे केस दाखल केलेली होती.परंतु त्यांनी 14 महिने या केस बाबत कोणतीही कल्पना त्यांना अथवा आरोपींना दिली नाही.
माहिती अधिकारात अशी केस येथे नसल्याचे खोटे लिहून देण्यात आले. तसेच डॉ.संदीप आडके स्वतः कोर्टात गेल्यानंतर केसच्या चुकीच्या तारखा दिल्या गेल्या. त्यानंतर याबाबतीत श्री बुक्के यांना कोर्टात माहिती दिल्यानंतर ते डॉ. आडके यांच्यावर चिडले व एकेरी भाषेत बोलून उलट त्यांच्यावरच सरकारी कामात अडथळा आणल्या बाबत तक्रार करण्यासाठी सांगण्यात आले. दि. 19/ 12 /22 रोजी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही तक्रार नसताना त्यांना अनधिकृतणे बसवून ठेवण्यात आले व त्यांची पोलीस तक्रार घेतल्या गेली नाही.त्यानंतर मुद्दामहून महिन्याच्या अंतराने तारखा देण्यात आल्या व या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर व या संस्थेवर कोणतीही कारवाई केली नाही. याउलट चार दिवसापूर्वी पैशाच्या भ्रष्टाचारात सामील असलेल्या वामा इव्हेंटच्या विक्रम पटवर्धन याचे नाव या केसमधून कमी करण्यात आले.डॉ. आडके यांनी डॉ.नारायण कर्णे, पुणे ,डॉ.अजित शिंदे, सांगली , डॉ.नितीन देशपांडे व डॉ.राजेंद्र अभ्यंकर ,कोल्हापूर, डॉ. बी. शिवशंकर पिल्लाई व डॉ.प्रदीप कोठाडीया ,सोलापूर, डॉ.वासुदेव गादेगोने ,चंद्रपूर व विक्रम पटवर्धन वामा इव्हेंट,मुंबई यांच्या विरोधात संस्थेचे नियम न पाळणे ,करोडो रुपयांच्या पैशांची अफरातफर करणे, वैद्यकीय कॉन्फरन्सच्या नावांवर दारूच्या पार्ट्या करणे, रशियन मुलींचे डान्स बघणे अशी अनैतिक कामे करणे, इन्कम टॅक्स चुकवणे , निवडणुका न घेताच वर्षांनुवर्षे अनधिकृतपणे कार्यकारणी चालवणे, संस्थेच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलणाऱ्यांना संस्थेतून अनधिकृत पणे काढून टाकणे असे गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत व त्या बाबतीतील सर्व पुरावे देण्यात आलेले होते.
सध्या संस्थेचे अध्यक्ष म्हणवून घेणारे डॉ.राजेंद्र अभ्यंकर हे कोणतीही निवडणूक न लढता डॉ. पराग संचेती ,पुणे यांच्या आशीर्वादाने विराजमान झालेले आहेत. ही मंडळी तसेच डॉ.कर्णे यांनी त्यांच्येच अध्यक्ष असलेले डॉ. वासुदेव गादेगोणे यांनाच बडतर्फ करून टाकले होते. ही मंडळी संस्थेच्या नावावर दरवर्षी एक नवीन पॅन कार्ड व बँकेत खाते उघडतात व कॉन्फरन्स च्या नावाखाली कोट्यावधी रुपये मेडिकल कंपन्यांकडून स्पॉन्सरशिपच्या नावे वसूल करतात. संस्थेच्या सदस्यांकडून वेगवेगळ्या मार्गाने पैसे उकळतात, त्याचे कुठलेही ऑडिट न करता हा पैसा अनैतिक मार्गाने वाटून घेतला जातो. हे पैसे जमा करण्यासाठी विक्रम पटवर्धन वामा इव्हेंट द्वारे पैसे वसूल करतो व हा हिशोब इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला न दिल्यामुळे कोट्यावधी रुपयांचा इन्कम टॅक्स बुडवल्यामुळे दोन वर्षांपूर्वीच इन्कम टॅक्स विभागाने या संस्थेची खाती गोठवली होती व सुमारे 12 लाख 30 हजार रुपये दंड वसूल केलेला होता. घटनेतील कोणतेही नियम न पाळल्यामुळे नेहमीच या संस्थेमध्ये तक्रारी होत असतात अशीच एक तक्रार दोन वर्षांपूर्वी याच धर्मादाय कार्यालयामध्ये नोंद आहे. इतक्या गंभीर बाबी सातत्याने बुक्के यांच्यासमोर मांडलेल्या होत्या तरीसुद्धा त्यांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. खरे तर या संस्थेतील सर्व भ्रष्ट पदाधिकारी तात्काळ निलंबित करणे व प्रशासक नेमणे आवश्यक होते ,तसेच या संस्थेची 1950 च्या नावे , चिन्हे कायद्यानुसार नोंदणीच चुकीची आहे त्यामुळे या संस्थेची नोंदणी तात्काळ रद्द करणे गरजेचे होते. तसेच 27 ऑक्टोबर रोजी जळगाव येथे होणारी मोओकॉन 2023 ही कॉन्फरन्स तात्काळ रद्द करणे गरजेचे असताना सुद्धा यावर कोणतीही कारवाई न करता उलट या भ्रष्ट पदाधिकाऱ्यांना तांत्रिक मुद्द्यांवर वेळ काढूपणा करून श्री बुक्के यांनी या भ्रष्टाचारामध्ये मदतच केलेली आहे.
तसेच आपल्या कार्यालयातील 60 टक्के वेळ आपली स्तुती करण्यात व आपण कसे भ्रष्टाचारी नाही हे सांगण्यात ते घालवतात. याचा त्रास त्यांच्यासमोर हात जोडून न्यायाची वर्षानुवर्ष अपेक्षा करणाऱ्या वकील व त्यांच्या निष्पाप अशीलांवर होत आहे. त्यांच्या विक्षिप्त व गैरवर्तुणुकीचे अनुभव कोणीही त्यांच्या कोर्टात जाऊन घेऊ शकतो.जर माझ्यासारख्या अति उच्चशिक्षित ,प्रामाणिक डॉक्टरांबरोबर कोर्टामध्ये अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्यांना का न्याय मिळणार? ही तर संपूर्ण न्यायव्यवस्थेचीच चेष्टा मांडली आहे. जर तात्काळ सुधीर बुक्के ,महाराष्ट्र अस्थिरोग संघटना व मोओकॉन 2023 ,जळगाव कॉन्फरन्स वर कारवाई नाही झाली तर संपूर्ण न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास उडण्यास हे उदाहरण कारणीभूत ठरेल. तीन दिवसांपूर्वी इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशन या संस्थेतील भ्रष्टाचाराबाबत डॉ.आडके व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार माननीय दिल्ली उच्च न्यायालयाने यातील भ्रष्ट डॉक्टरांवर अतिशय कठोर ताशेरे ओढून या संस्थेवर प्रशासक नेमलेला आहे असे डॉ.संदीप आडके म्हणाले. मोओकॉन कॉन्फरन्सच्या आयोजक व त्यात सहभागी होणाऱ्या सर्वांवर अतिशय कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलेला.