भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत माळवदे यांना डॉ. कलाम राष्ट्र उभारणी पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले.
सोलापूर येथील व्ही व्ही पी कॉलेज येथे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम याच्या 94 व्या जयंतीनिमित्त ड्रीम फाउंडेशन, डॉ. कलाम मिशन, कोचिंग क्लासेस असोसिएशन महाराष्ट्र राज्य व अन अकॅडमी सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सीसीए चे राज्य अध्यक्ष प्रा. डॉ. पी एम वाघ यांच्या हस्ते प्रशांत माळवदे यांना शाल,प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी , आत्मीय एज्युकेशन पुणे रिजनल हेड डॉ. नीरजकुमार शहा, सीसीए राज्य सरचिटणीस ज्ञानेश्वर ढाकणे, व्हीव्हीपी कॉलेज सोलापूरचे अध्यक्ष प्रा.डॉ. जी के देशमुख,प्राचार्य कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते .
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे, धैर्यसिंह निंबाळकर,सरपंच रणजीत जाधव, उपसरपंच नितीन शिंदे, धोंडीराम शिंदे, प्रा. शशिकांत देशपांडे, शिक्षक रामचंद्र सावंत,धनंजय धोत्रे, आनंद देशपांडे,लुकमान इनामदार, बाळासाहेब कापसे,रामदास नागटिळक,राहुल ताटे,प्रा.वैभव घाडगे यांनी अभिनंदन केले आहे.