सोलापूर प्रतिनिधी
पद्मविभूषण महानायक डॉ अमिताभ बच्चन सेवाभावी संस्थेच्या वतीने बुधवार दिनांक २१/ १०/ ३०रोजी संध्याकाळी 6 :00 वाजता श्री दत्त मंदिर 256 गाळा कविता नगर च्या समोर येथे 14 महानायक प्रेमींना सन्मान लायन्स क्लब सिटी सोलापूरचे अध्यक्ष मोहन भूमकर यांच्या हस्ते अमिताभ बच्चन यांच्या प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विजय इप्पाकायल, श्रीनिवास गंधमल, अनिल बुरांडे उपस्थित होते यावेळी नागेश म्हैत्रे, महेश परांडकर,दत्तात्रय खैरमोडे, रमेश शेट्टी, बाळकिसन गणपा, श्रीनिवास येलगेटी, बाळराज कानेपागुलु, अंजन सज्जन या सर्व महानायक प्रेमींना प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आले.
यावेळी मनोगता मध्ये भूमकर यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील डायलॉग सादर करून उपस्थित महानायक प्रेमींच्या मन जिंकला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश सुंचू, किशोर म्हैत्रे, चंदु सिताप ,संजय सागळे, राजकुमार घटी, जेयश कोकणे ,विठ्ठल डाले, नितीन मुदगुंडी, राजु पुटाने, मुतिहार शेख ,कमलाकर शिंदे, नरसिंग गोलेकर आदीने परिश्रम घेतले यावेळी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विजय इप्पाकायल यांनी सर्व मान्यवरांना व महानायक प्रेमी यांना आभार मानले