सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
शाहू शिक्षण संस्था पंढरपूर संचलीत जुळे सोलापूर येथे स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयातील अनुलक्ष सभागृहामध्ये सोलापूर शहर सायबर पोलीस ठाणे यांचे वतीने "सायबर क्राईम" या विषयावरील व्याख्यान संपन्न झाले
प्रारंभी शाहू शिक्षण संस्थेचे आराध्य दैवत राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमास सुरुवात झाली. उपस्थित मान्यवर व्याख्यात्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी सोलापूर शहर सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा, सायबर एक्सपर्ट अविनाश पाटील, तसेच पोलीस अंमलदार अश्विनी लोणी, सचिन अंबलगी,मच्छिंद्र राठोड. हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यातील प्रमुख
व्याख्यात्यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडियाचा दुरुपयोग, बनावट लिंक व ओटीपी फसवणूक यासारख्या वाढत्या सायबर गुन्ह्यांविषयी जागरूक केले. तसेच इंटरनेट वापरताना घ्यावयाची काळजी, डिजिटल सुरक्षिततेच्या महत्त्वाच्या बाबी आणि सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदविण्याची योग्य पद्धती याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच विज्ञान युगातील विविध सोशल मिडीयाच्या उपकरणांचा व तंत्रज्ञानचा वापर करत असताना समाजातील प्रत्येकांने तीन बाबींची विशेष काळजी घ्यावी मनातील भिंती, दुप्पट पैस्याची लालच, स्वताची फसवणूक होऊ नये यासाठी इंस्टाग्राम, फेसबुक, व्हाटसॲप, इत्यादीच्या अतिरेक वापर टाळून हॅकर्सपासून ,तसेच मानसीक, अर्थीक, फसवणूक होण्यापासून स्वताची व कुटुंबाची काळजी घ्यावी. सोशल मिडीया पासून सावधानता बाळगावी असे मत व्यक्त केले.
तसेच अध्यक्षीय आढाव्यात महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या झुलेखा पिरजादे यांनी, सायबर क्राईमचे महत्त्व,व आजच्या काळातील सायबर गुन्ह्यांविषयी समाजातील सर्व लोकांपर्यंत जनजागृती होणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजली माने हिने केले. स्वागत व प्रस्तावना साईकिरण ननावरे, तर आभार प्रदर्शन ऋचली बिराजदार यांनी केले.
. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा.संतोष पाटील, प्रा.शिवाजी कांबळे,प्रा. सुमय्या शेख, तसेच बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थीनी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते.