पंढरपूर प्रतिनिधी
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ,पंढरपूर संचलित, श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय,सुस्ते प्रशालेत एस.आर.पी कॅम्प सोलापूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय 100 मी.धावणे (19 वर्षे वयोगट) स्पर्धेत प्रशालेतील दहावीची विद्यार्थिनी कु.प्रतिभा अर्जुन पवार हीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल प्रशालेच्या वतीने प्राचार्य प्रा.सुधाकर पिसे यांचे हस्ते हार,शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन तिचा सत्कार करण्यात आला.तिला मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक गणेश पाटील यांचाही सन्मान करण्यात आला.
तिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.मदन क्षीरसागर, सचिव ॲड.वैभव टोमके, उपाध्यक्ष प्रा.शिवाजी वाघ, सहसचिव अजित नडगिरे, खजिनदार सलीम वडगावकर, जेष्ठ संचालक आप्पासाहेब चोपडे,दिलीप घाडगे,अनिरुद्ध सालविठ्ठल,मुकुंद देवधर, विजयकुमार माळवदकर,सौ.सुनिताताई मोरे आदींनी अभिनंदन केले.
यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक रणजित शिनगारे व प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.