खडकी प्रतिनिधी
पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या प्रणव व्यवहारे याला पदचत्तर प्रवेश परीक्षेत देशात आठवा क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. प्रणव व्यवहारे यांनी बारामती येथे क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत आहे. प्रणव देशातील आठवा आल्याने त्याचे त्याच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
प्रणव याला लहानपणापासून मुक्या जनावरांच्या विशेष आवड होती, त्यांनी लहानपणापासून मुक्या जनावरांवर उपचार देखील करणे सुरू केले होते. माणसाप्रमाणे मुक्या जनावरंवर उपचार करणे कठीण असते. माणूस बोलू शकतात, मात्र मुके प्राणी बोलू शकत नाही त्यांच्यावर उपचार करणे अत्यंत अवघड असते असे प्रणव यांनी सांगितले.
प्रणवने बारावीनंतर पशुवैद्यकीय महाविद्यालय मध्ये शिक्षण घेण्याचे ठरविले, त्यांनी शिरवळ येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. प्रणवने इंडियन कौन्सिल ऑफ एग्रीकल्चर रिसर्च यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या पदव्युत्तर प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा दिली, या परीक्षेत एनिमल सायन्स या विषयांमध्ये विशेष गुण मिळवून त्याने देशात आठवा क्रमांक पटकाविला आहे. या परीक्षेसाठी देशातील अनेक विद्यार्थी प्रयत्न करतात, प्रणवला मिळालेल्या यशाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून विशेष कौतुकाचा वर्षाव होत आहे.