गादेगाव प्रतिनिधी
आज शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगाव येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे.अब्दूल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.आज वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो.
जयंती निमित्त शरदचंद्र चटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कलाम यांच्या जीवन चरित्र विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कलाम यांना वाचनाची व अभ्यासाची आवड होती म्हणून आजचा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो असं संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी सांगितले यावेळी प्रशालेतील विद्यार्थी यांनी कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केली.