सांगोला प्रतिनिधी
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार व ' काय झाडी ,काय डोंगार, काय हाटील सगळं ओके मधी हाय ' या डायलॉगमुळे जगभरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेले विकासरत्न शहाजी बापू पाटील यांचा वाढदिवस सांगोल्यातील शिवसेनेसह तमाम बापू प्रेमींनी ढोल, ताशे, हालगीच्या तालात फटाक्याची आतिषबाजी करून सांगोला शहर तालुक्यात विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी आ.शहाजी बापू पाटील यांनी संपर्क कार्यालयात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला शनिवारी दिवसभर सांगोला येथील त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर सांगोला शहर व तालुक्यातील तसेच पंढरपूर( भाळवणी )गटातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते, सर्व पक्षीय नेतेमंडळी , मित्रपरिवार , तमाम बापू प्रेमींनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी ज्येष्ठ नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते, आप्तेष्टांच्या शुभेच्छामुळे आमदार शहाजी बापू पाटील भाराहून गेले होते.
चिकमहुद येथील निवासस्थानी पत्नी रेखाताई पाटील, माजी सरपंच सुशिला कदम, स्नुषा अपेक्षा पाटील, शोभा कदम,राधिका मगर , प्रिती पाटील ,आक्काताई भोसले तसेच गावातील असंख्य महिलांनी आमदार शहाजी बापू पाटील यांचे औक्षण केले यावेळी ढोल, ताशे, हलग्या वाजवत फटाके वाजवून त्यांच्या घरासमोर पत्नी रेखा पाटील व आमदार शहाजी बापू , पंढरीनाथ भोसले , चिरंजीव दिग्विजय पाटील, नातू शंभूराजे पाटील यांनी केक कापून बापुंना भरविला.
दरम्यान मुंबईत शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार शहाजी बापू पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर काल शनिवारी सकाळी खासदार श्रीकांत शिंदे,राज्याचे मंत्री शंभूराज देसाई,मंत्री दादा भुसे , राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे पाटील,शिवसेनाप्रणित शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय पवार,छोटा पुढारी घनश्याम दराडे , मनसेचे दिलीप धोत्रे , ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड, तानाजी पाटील , भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार, उद्योगपती बाळासाहेब एरंडे , माजी नगराध्यक्ष मारुती बनकर, रफिक नदाफ,विठ्ठलचे संचालक धनंजय काळे आदी मान्यवरांनी आ.शहाजीबापू यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या सांगोला येथील अँड उदय घोंगडे यांच्या निवासस्थानी आमदार शहाजी बापू पाटील यांचे माजी नगरसेविका शोभा काकी घोंगडे, ज्योती घोंगडे ,प्राजक्ता घोंगडे यांनी औक्षण करून केक कापून शुभेच्छा दिल्या यावेळी आनंद घोंगडे, अजिंक्य घोंगडे, दर्शन घोंगडे आदी उपस्थित होते. शहरातील महात्मा फुले चौकात आमदार शहाजी बापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ७० टक्के सवलतीच्या दरात एल ई डी टीव्ही, वाटर फिल्टर साहित्य विक्री स्टाॅलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते केले.
महूद येथील ग्रामदैवत श्री अंबिका देवीचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. मंदिरात आ.पाटील यांच्या हस्ते वाॅटर फिल्टर चे उद्घाटन केले , यावेळी महूद गाव व वाड्या वस्त्यांवरील शालेय विद्यार्थिना खाऊचे वाटप केले यावेळी संजय मेटकरी, अंगद जाधव , महेंन्द्र बाजारे, संतोष पवार, के टी पवार , यशवंतराव खंबाले,कैलास खबाले, डॉ.शरद नागणे,ओंकार लवटे, काका नागणे , विठ्ठल बागल,अरुण नागणे, उमेश पाटील, सुखदेव चव्हाण, बाळासाहेब पवार, नैनेश कांबळे,भिमराव नागणे , दत्ता येळे,संजय चव्हाण , सद्दाम मुजावर, रमेश रुपनर,धनंजय कांबळे आदी बापू प्रेमींनी फटाके वाजवून केक कापून त्यांना शुभेच्छा दिल्या वाटेत शिवणे ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच दादासाहेब घाडगे ,उपसरपंच उदय घाडगे भीमशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय बनसोडे ,विलास घाडगे, प्रतापराव पाटील आदी मान्यवरांनी फेटा बांधून श्रीफळ देऊन सत्कार केला
दिवसभर सांगोल्यात त्यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादीचे अँड दीपक पवार, विधानसभा प्रमुख प्रा, संजय देशमुख,अँड विश्वासराव गायकवाड,शिवसेना उपजिल्हाप्रमुख जगदीश पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख सागर पाटील, तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, शहर प्रमुख समीर पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख गुंडा खटकाळे, माजी नगरसेवक सोमेश यावलकर, आरपीआय तालुकाध्यक्ष खंडू सातपुते, किर्तीपाल बनसोडे,पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष इंगोले , पांडुरंग मिसाळ, बिरापंच आलदर, बाबासाहेब पाटील, विलास व्हनमाने, उद्योगजक किरण पांढरे, भागवत तंडे, सौदागर केदार, योगेश खटकाळे, श्रीनिवास करे, सोमा ठोकळे, अभिजीत नलवडे,अनिल मोटे, विष्णुपंत केदार, बाळासाहेब आसबे, महादेव पाटील, अजिंक्य शिंदे, शाहू मेटकरी, संतोष देवकाते, बाळासाहेब झपके, बाळासाहेब बनसोडे, उल्हास धायगुडे, अमोल खरात, धनंजय काळे ,सचिन काळे, डॉ दादा जगताप, राजेंद्र मेटकरी, लक्ष्मण भोसले, नवनाथ येडगे तसेच शहरातील मुस्लिम समाजाचे हाजी शब्बीर भाई खतीब, दिलावर तांबोळी,युसूफ मुल्ला, उस्मान इनामदार,इसाक तांबोळी,रौऊफ तांबोळी,मगबूल मुल्ला, निसार मुलाणी,अय्याज मणेरी,खलील मेरी, महेबुब मणेरी यांच्यासह परीट समाज ,नाभिक समाज, गोंधळी समाज,होलार समाज ,रामोशी समाज बांधव, विविध सामाजिक, राजकीय संघटना, पत्रकार संघटनेच्या वतीने आ.शहाजीबापू पाटील यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन फेटा बांधून सत्कार केला.