पंढरपूर प्रतिनिधी
श्रीमती बाई लिंबा वाघे रा बेंबळी जिल्हा धाराशिव येथील भाविकांनी श्री विठ्ठलास 255 ग्रॅम वजनाचा सोन्याचा करदोडा व श्री रूक्मिणी मातेस मंगळसूत्र 19 ग्रॅम वजनाचे आज रोजी श्री रूक्मिणी पांडुरंग चरणी अर्पण केले त्याची अंदाजित रक्कम रु 1799399/- आहे देणगीदार यांचा सत्कार आस्थापना विभाग प्रमुख विनोद पाटील यांचे हस्ते भाविकांना साडी उपरणे तसेच श्री विठ्ठल रूक्मिणी ची प्रतिमा देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
त्यावेळी मंदिरे समितीचे सराफ व मंदिरे समितीचे कर्मचारी उपस्थित होते.