तुंगत प्रतिनिधी
संपूर्ण राज्यात सध्या मराठा आरक्षणाचे समर्थनार्थ आंदोलने सुरू असून पंढरपूर तालुक्यातील तुंगत या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने करून पुढारी व नेते मंडळी यांना जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत गाव बंदीचा निर्णय घेण्यात आला. यावेळी चे नेतृत्व समाजाच्या वतीने गावचे ग्रामपंचायतीचे सरपंचासह सर्व सदस्य आणि माजी ग्रामपंचायत सदस्य यांनी केले.
मराठा योद्धा म्हणुन लोकशाहि मार्गाने मराठा समाजास कुणबी म्हणुन आरक्षण मिळावे गेले महिनाभरापासुन मनोज जरांगे-पाटील हे आंदोलन करीत असुन राज्य शासनाने मराठा समाजास न्यायालयात टिकणारे आरक्षणासाठी एक महिना वेळ मागितला होता. त्यानुसार समाजाने ४० दिवसात आरक्षण देण्याची मागणी केली होती हि मुदत संपल्यानंतर जरांगे-पाटील यांनी समाजाचे वतीने नुकतीच भुमिका स्पष्ट केली असुन गावा-गावात राजकिय नेत्यांना गावबंदी करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार तुंगत याठिकाणी सकल मराठा समाजाचे वतीने आंदोलन करण्यात आले.
यावेळी सरपंच डाॅ. अमृता रणदिवे, माजी सदस्य औदुंबर गायकवाड,सदस्य सुधीर आंध, बत्तास वनसाळे, रमेश आंध, सुभाष भोसले, विजय सुरवसे, आण्णा घोडके, यांचेसह मराठा समाज मोठ्या संख्येत उपस्थित होता.