कोंगनोळी प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गावोगावी मोठ्या प्रमाणात घटस्थापना ते विजयादशमी (दसरा) या दरम्यान श्री दुर्गामाता दौड पार पडते.
कोंगनोळी ता. कवठे महांकाळ तेथे घटस्थापना ते विजयादशमी (दसरा) या दरम्यान दुर्गामाता दौडीचे मोठ्या उत्साहाने आयोजन करण्यात आले होते.
दासऱ्यादिवशी महादौड काढण्यासाठी जात- पात, राजकारण विसरून देव, देश, धर्माविषयी जागृती करण्यासाठी शेकडो कोंगनोळीकर नागरीक मोठ्या प्रमाणात दौडीसाठी ग्रामदैवत श्री कोंगाई देवीच्या मंदिरासमोर एकत्र जमले होते.
यावेळी आदिमाया-आदिशक्तीचा जागर करण्यात आला. श्री छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, दुर्गा माता, कोंगाई माता, जय श्री राम. अशा घोषणांनी कोंगनोळी नगरी दणाणून सोडली.
पहाटे 6 वाजता कोंगाई मंदिर समोर एकत्र येत हातामधे भगवा ध्वज घेऊन डोक्यावर फेटा, भगवी टोपी, पांढरी टोपी परिधान करून मुखाने भारतमातेचा जयघोष करत व छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणा मंत्र म्हणत गावातून ठरलेल्या मार्गावरून मार्गक्रमण करत दौडीची गीते म्हणत दुर्गामाता दौडीस सुरुवात झाली. यावेळी नागरिकांनी रस्त्यावर रांगोळी काढून फुलांची उधळण करीत ठिकठिकाणी दौडी चे पाणी घालून फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले. त्यानंतच्या रेणुका देवीच्या मंदिरासमोर देवीची आरती झाली. तसेच क्रांती नवरात्र उत्सव मंडळ यांनी बसवलेल्या दुर्गामाता च्या मूर्तीसमोर आरती करण्यात आली. आणि शेवटी ग्रामदैवत कोंगाई देवीच्या आरतीने तसेच ध्येय मंत्राने श्री दुर्गामाता दौडीचा समारोप करण्यात आला.
दौडीमधे महिलांचा देखील मोठया प्रमाणावर सहभाग होता गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व संस्थांचे पदाधिकारी सदस्य. यांच्या प्रमुख उपस्थितीमधे ही महा दौड पार पडली.