पंढरपूर प्रतिनिधी
श्री रुक्मिणी विद्यापीठ पंढरपुर संचलित श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदीर मध्ये दिव्यांग राष्ट्रीय खेळाडू सुमनताई जगताप-गायकवाड यांची मुलाखत घेण्यात आली.
इयत्ता ४ थी च्या वर्गाने. या मुलाखतीचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री संतोष कवडे होते.
एकलव्य पुरस्कार विजेता सुमनताई जगताप ह्या अॅथलेटीक्स मधील राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू आहेत. इ.४थी च्या विध्यार्थ्यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारत त्यांची माहीती घेतली . त्यामध्ये त्यांना कोणती पदके मिळाली? खेळाची प्रेरणा कोणाकडून घेतली? भविष्यातील योजना कोणत्या?दररोज किती सराव करावा ? आपला व्यवसाय कोणता ? आपले प्रेरणास्थान कोण आहेत ? आम्हाला कोणता संदेश दयाल ? असे अनेक प्रश्न विचारले.
आपल्या मनोगतमध्ये त्या म्हणाल्या "मुलांनी मोबाइलच्या जास्त नादी न लगता व्यायाम करावा, मैदानी खेळ खेळावेत. खेळात आपलं भविष्य घडवाव अस सांगितिक. खेळातही खूप चांगल्या प्रकारची संधी आहे.परंतु सातत्य व सरावाणे माणूस मोठा होतो."मुलाखतीसाठी प्रशाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते . इ. ४ थी चे वर्गशिक्षक श्री महेश भोसले यांनी आभार मानले.