भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील माळावरील श्री भवानी देवीच्या यात्रेस आज पासून सुरुवात झाली आहे.
आज पहाटे श्री ची महापूजा व अभिषेक करून यात्रेची सुरुवात झाली त्याचबरोबर आज संध्याकाळी साडेपाच वाजता श्री ची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर रात्री आठ वाजता छबिनाची मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे.
त्यानंतर रविवारी पहाटे श्री ची महापूजा व अभिषेक करण्यात येणार आहे. सकाळी नऊ वाजल्यानंतर विविध अशा स्पर्धेची सुरुवात करण्यात येणार आहे. यावेळी लेझीम, गजी ढोल, धनगरी ओव्या, भेदी गाणी अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी हि यात्रा शनिवार व रविवार अशी दोन दिवस भरणार आहे.तसेच रविवारचा बाजार सुद्धा यात्रेत भरणार आहे.या यात्रेस व्यापारी ,भावीक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी असे आव्हान यात्रा कमिटीच्या वतीने सरपंच राजकुमार पाटील यांनी केले आहे.