गणेश हिरवे मुंबई प्रतिनिधी
कुर्ला पश्चिम येथील कोहिनूर ग्रुप संचलित, प्रीमियर शिक्षण मंडळाचे गांधी बाल मंदिर हायस्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेचा इयत्ता दहावीचा मार्च २०२३ चा निकाल ९७.८९ टक्के लागला. या शाळेला नुकताच बृहन्मुंबई नॉर्थ झोन एल वार्ड शिक्षण विभागाच्या वतीने उत्कृष्ट निकाल लागल्या बद्दल सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.या शाळेत दरवर्षी विविध उपक्रम आणि सहशालेय गोष्टी अत्यंत उत्साहाने साजऱ्या करण्यात येतात.
शाळेतील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, पालक आदी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अत्यंत तळमळीने मेहनत घेऊन त्यांना शिकवितात, प्रशिक्षण देतात. शाळेला दरवर्षी शिक्षण, क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन तसेच इतर अनेक उपक्रम बक्षिसे मिळत असतात.शाळेचे एन सी सी युनिट देखील असून त्याचे कार्य देखील उत्तम चालते.एल वार्ड च्या वतीने सन्मान प्राप्त झाल्याने शाळेच्या व्यवस्थापन समितीने शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्वांचेच अभिनंदन केले आहे.