गणेश हिरवे मुंबई प्रतिनिधी
प्रेम तुझे आहे आई
सर्व जगत भारी
आई प्रथम गुरु
आई कल्पतरू
आईबद्दल कितीही लिहिलं तरी कमीच असते, कारण आई एवढं प्रेम कोणीच करू शकत नाही..
जोगेश्वरी पूर्व अस्मिता संचालित छत्रपती शिवाजी शिशु शाळा आणि राम गोपाल केडिया प्राथमिक विभाग आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने काल दिनांक १४ सप्टेंबर रोजी मातृदिन साजरा करण्यात आला.
देशात पिठोरी अमावस्येला मातृदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी मुलं आपल्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा देतात.स्वत:चा विचार करण्याआधी कोणतीही आई आपल्या मुलांचा अधिक विचार करत असते.
यावेळी सर्व मुलांनी दूध, पाणी, गंध, फुल, अक्षता आदी पूजेच्या साहित्याने आईचे पाद्य पूजन केले. आईचे औक्षण करून तिला भेट कार्ड व गुलाबपुष्प दिले. आईसाठी मुलांनी गाणी म्हटली, कविता सादर केल्या. छान छान भावना सांगितल्या. तसेच आई व कन्या यांनी छान गाण्यावर नृत्य पण केले. शिक्षकांनी मुलांना आईचे महत्व अधोरेखित केले.
संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर पारखी यांनी सर्व पालकांशी हितगुज केले. यावेळी प्राथमिक च्या मुख्याध्यापिका रचना पवार देखील उपस्थित होत्या. खूपच भावूक व सुंदर असा मातृदिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.