ओबीसी शिंपी समाजाच्या आरक्षणावर अन्याय सहन करणार नाही,
जळगाव प्रतिनिधी
अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघ महाराष्ट्र शाखा व श्री क्षत्रिय अहिर शिंपी हितवर्धक संस्था याच्या तर्फे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश ढवळे यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र राज्य संघटक मनोज भांडारकर जळगाव शहर समाज अध्यक्ष श्रीराजेंद्रकुमार सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन सादर करण्यात आले .
सदर निवेदनामध्ये सध्या परिस्थिती चालू असलेल्या घडामोडी मध्ये ओबीसी समाजावर अन्याय होता कामा नये व शिंपी व OBC समाजातील जातींच्या आरक्षणाला कुठे धक्का लागू नये या आशयाचे निवेदन पदाधिकाऱ्यांनी सादर केले या प्रसंगी बाराबलुतेदार महासंघाचे विभागीय अध्यक्ष मा मुकुंदराव मेटकर यांनी निवेदना विषई माहिती दिली व आमचे निवेदन हे सरकार दरबारी पाठवावेत असे सांगितले.
या प्रसगि संस्था उपाध्यक्ष विवेक जगताप सचिव अनिल खैरनार कोषाध्यक्ष चेतन खैरनार सहसचिव दीपक जगताप युवक अध्यक्ष जितेंद्र शिंपी जेष्ठमार्गदशक शैलेंद्र मांडगे दिलीप सोनवणे सुनील बाविस्कर शिवसेना पदाधिकारी प्रमोद भाऊ शिंपी अमित जगताप उदयोजक किरण भाऊ सोनवणे युवा पदाधिकारी सुमित अहिरराव योगेश व उमेश सोनवणे ई उपस्थित होते