भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील क्रांती सूर्य महात्मा फुले युवक संघटना व गणेश उत्सव मंडळाच्या वतीने चिरंजीव प्रियांशू अरुण म्हेत्रे याला राष्ट्रीय पात्रता प्रवेश सह परीक्षा (neet) परीक्षा मध्ये यश मिळाल्याबद्दल व रत्नागिरी येथील शासकीय कॉलेज ला एम बी बी एस ला प्रवेश मिळाल्या बद्दल जयराम शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रियांशू म्हेत्रे म्हणाला की माझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत,माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कुल भाळवणी येथे झाले.तर अकलूज येथे बारावी उत्तीर्ण झालो.विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे.मोबाईल सारख्या गोष्टी वापरल्या जाऊ नयेत.आई वडील व शिक्षक यांचा सन्मान केला पाहिजे. तरच जीवनात आनंद यश मिळवले जाते.
यावेळी विजय शिंदे, अमोल लिंगे,किरण लिंगे, किशोर खरडकर ,सचिन म्हेत्रे सुयश लिंगे दीपक शिंदे डॉ वैभव लिंगे अमोल म्हेत्रे सर्व मित्र परिवार व मंडळातील सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते.