मुंबई प्रतिनिधी
३ सप्टेंबर २०२३ रोजी अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली,राज्य महाराष्ट्र यांची पंढरपूर येथे मिटिंगमध्ये विविध विषयावर ठराव झालेल्याचे निवेदन मुंबई मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली,राज्य महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष महेश ढवळे यांनी वरील विषयावर निवेदन दिले आहे.
यावेळी प्रदेश अध्यक्ष महेश ढवळे म्हणाले की, राज्य सरकारने येत्या कार्तिक एकादशीला संत नामदेव महाराज यांची जयंती सोहळा शासन स्तरावर साजरी करण्यात यावी असा ठराव मंजूर केला. संपूर्ण देशात शिंपी समाज विविध पोट जातीत रोटी बेटी व्यवहार करने व विखुरलेला समाज संघटन करून एकाच छताखाली काम करण्याचा ही निर्णय घेतला पंढरपुर येथे संत नामदेव महाराज यांचे स्मारक तात्काळ करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. पंढरपूर ते घुमान (पंजाब) वारकरी सदभावना रेल्वे गाडी सुरू केली जावी.नाशिक येथे आगामी कुंभमेळाच्या ठिकाणी संत नामदेव आखाडा साठी जागा उपलब्ध करून द्यावी, समाजातील युवकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी निधी बँक स्थापन करण्याचेही ठरले.
सर्व शिंपी समाज बांधवांनी एकत्र येऊन समाजात एकोपा निर्माण केला पाहिजे.तसेच सर्व शिंपी सह पोट जातीची जनगणना करून प्रदेश स्तरावर कोअर कमिटी करण्यात यावी. संत नामदेव महाराज यांची २०२५ ला संजीवन समाधी सोहळ्यास ६७५ वर्ष पूर्ण होत असून यासाठी केंद्र शासनाचे चलनी नाणे व टपाल तिकीट काढले काढावे व मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करावे पंढरपूर, नरसी ,घुमान येथे यात्री निवास बांधले गेले पाहिजे. पंढरपूर येथील संत नामदेव महाराज यांच्या पायरीचे दर्शन हे आषाढी व कार्तिकी ला वारकरी,भाविकांना सुलभ दर्शन होण्यासाठी मंदिर समितीने लक्ष दिले पाहिजे.
अशा विविध मागण्या फडणवीस यांच्या कडे देण्यात आला आहेत. यावेळी वरील सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. अशी माहिती महेश ढवळे यांनी दिली.