कोल्हापूर प्रतिनिधी
नामदेव शिंपी समाज युवक संघ महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिकेत हिरवे यांच्या मातोश्री मार्गदर्शक व सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा अनिल हिरवे यांची भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी चिटणीस पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच नामदेव शिंपी समाज युवक संघ, महाराष्ट्र सर्व सभासद व सदस्य यांनी ही हिरवे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी हिरवे म्हणाल्या की शासनाच्या विविध प्रकारच्या योजना आहेत.त्या जास्तीत जास्त महिलांच्या पर्यंत पोचवली जाईल. त्याच बरोबर समाजातील महिलांना व्यवसाय,उद्योग सुरू करण्यास मार्गदर्शन केले जाईल.