पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
पंढरपूर शहरातील गणेश विसर्जन सोहळा २०२३ कामी शासनाने पर्यावरण पुरक व प्रदुषण मुक्त गणेश विसर्जन करणेबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार आज दि. २५/०९/२०२३ ते दि.३०/०९/२०२३ या कालावधीत गणेश विसर्जनासाठी गणेशमूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आलेली आहेत. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, सावरकर चौक, ठाकरे चौक, कॉलेज चौक, भोसले चौक, महात्मा फुले चौक, महाद्वार चौक, अंबाबाई पटांगण, अर्बन बँक चौक, यमाई तलाव अशा विविध ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आलेली आहेत.सद्यस्थितीत उजनी धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलेले आहे.
त्यामुळे जिवीतहानीचा धोका टाळणेसाठी कोणीही नदीपात्रात गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी जाऊ नये. गणेशमूर्ती विसर्जनासाठी नगरपरिषदेने शहरातीतील विविध १४ ठिकाणे उभारलेल्या गणेशमूर्ती संकलन केंद्रात आपली गणेशमूर्ती जमा करावी. तसेच प्रत्येक गणेशमूर्ती संकलन केंद्र व प्रत्येक घाटावर निर्माल्य गोळा करणेसाठी नगरपरिषदेमार्फत निर्माल्य वाहनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्यावरण प्रदुषण टाळणेसाठी आपले निर्माल्य नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडे देऊन सहकार्य करावे.
तरी याद्वारे नगरपरिषदेमार्फत सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, नदीपात्रातील वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे जिवीताचा धोका टाळून गणेशमूर्ती विसर्जनासाठी नगरपरिषदेच्या संकलन केंद्रात गणेशमूर्ती व निर्माल्य गाडीत निर्माल्य देऊन गणेश विसर्जन सोहळा २०२३ सुरक्षित आणि प्रदुषण मुक्त होणेसाठी आपले योगदान द्यावे.
मुख्याधिकारी
नगरपरिषद पंढरपूर