पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
राज्यातील व सोलापूर जिल्ह्यातील अग्रगण्य बँक समजला जाणाऱ्या अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखा पैकी लक्ष्मी टाकळी अर्बन बँक शाखा सामान्यांच्या व्यावसायिकांच्या ग्राहकांच्या गरजा ना उपयोगी पडत असून बँकेने सुरू केलेल्या विविध कर्ज पुरवठा योजनेचा लाभ ग्राहकाने सभासदांनी नागरिकांनी घेऊन आपली प्रगती करावी बँकेचे सर्व संचालक मंडळ कर्मचारी वर्ग हे स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार काम करत असल्याने अर्बन बँक प्रगतीपथावर आहे.
ही बँक ग्राहक नागरीक व्यावसायिक सभासद यांच्या हितासाठी सदैव प्रयत्नशील असून बँकेने घरकुल योजना साडेआठ टक्के व्याज दराने उपलब्ध केली आहे त्याचाही लाभ सर्वांनी घ्यावा असे प्रतिपादन बँकेचे चेअरमन सतीश मुळे यांनी केले.
पंढरपूर अर्बन बँक टाकळी रोड शाखा या बँकेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त बँकेमध्ये बँकेचे मार्गदर्शक स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या प्रतिमेस व पांडुरंगाच्या प्रथमेश पुष्पहार अर्पण करून सत्यनारायण महापूजेस सुरुवात करण्यात व ग्राहक मेळावा ही आयोजित करण्यात आला होता.