सांगली प्रतिनिधी
पदवीधरांच्या विविध समस्या प्रभावीपणे सोडविता याव्यात यासाठी भारतीय जनता पक्ष,महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या सूचनेनुसार "भाजपा पदवीधर प्रकोष्ठची" स्थापना करण्यात आली आहे. प्रदेश संयोजक मा.धनराज विसपुते सांगली जिल्हा दौऱ्यावर आले असता भाजपा सांगली जिल्हा कार्यालयात धनराज विसपुते सरांच्या हस्ते मा. संदिप चव्हाण ( बाबा ) यांची भाजपा पदवीधर प्रकोष्ठ सांगली जिल्हा ( ग्रामीण ) संयोजक पदी निवड करण्यात आली तसेच मा. अनिकेत औताडे यांची भाजपा पदवीधर सांगली जिल्हा संयोजक पदी निवड करण्यात आली आहे , पश्चिम महाराष्ट्र विभाग सहसंयोजक म्हणुन सौ. कव्याश्री नलवडे यांची निवड करण्यात आली तसेच भाजपा पदवीधर प्रकोष्ठ सांगली जिल्हा सहसंयोजक मा.शैलेश फोंडे, मा.अजय जगताप , मा.डॉ.प्रशांत देशमुख यांची भाजपा पदवीधर प्रकोष्ठ सांगली जिल्हा समन्वयक पदी निवड करण्यात आली.
यावेळी पदवीधर प्रकोष्ठ प्रदेश संयोजक मा. धनराज विसपुते यांनी पदवीधर कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले पदवीधरांच्या समस्या समजून घेऊन त्या प्रभावीपणाने सोडिवण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच पदवीधर सदस्य ऑनलाईन व ऑफ लाईन नोंदणी करणे, पदवीधर मतदार नोंदणी , जॉब फेअर्स भरविने , मतदार यादी सुसूत्रीकरण कारणे, सिनेटनिवडणूक, तसेच येणाऱ्या काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद, स्थानिक स्वराज्य संस्था इ. विषयी मार्गदर्शन केले, माजी. आमदार भगवानराव साळुंखे यांनी उपस्थित पदवीधर यांना मार्गदर्शन केले.
प्रस्ताविक सुंदर पाटील यांनी केले व स्वागत व सूत्रसंचालन संदिप चव्हाण यांनी केले तर अनिकेत औताडे मनोगत व्यक्त केले, तसेच आभार डॉ. प्रशांत देशमुख यांनी केले
यावेळी शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार भगवानराव साळुंखे (आप्पा), पदवीधर प्रकोष्ठ सोशल मीडिया प्रमुख महाराष्ट्र प्रदेश सेल सिदेष घोंकर, सोशल मीडिया प्रमुख पश्चिम महाराष्ट्र शितेज कुळकर्णी, सोशल मीडिया प्रमुख महाराष्ट्र सहसंयोजक मुकुल देवले, सुंदर पाटील, माजी संघटन सरचिटणीस अर्जुन बाबर, अनिल वाळवेकर, शैलेश शिंदे, सचिन पवार, सुखदेव आयवळे, प्रविण तिकोटी, नामदेव सावंत, अनिल माने, बाबसो पाटील, रविंद्र पाटील, इ. उपस्थित होते.