सोलापूर प्रतिनिधी
श्रावण मासानिमित्त बाळीवेस येथील श्री. बृहन्मठ होटगी मठ 918 उत्तर कसबा सोलापूर येथील मठामध्ये श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथावर प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी यांच्या रसाळ वाणीतून प्रवचन चालू आहे.
काशी महापीठाचे श्री.श्री.श्री.1008 जगद्गुरु ज्ञान सिंहासनाधीश्वर डॉ.मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली व परमपूज्य होटगीश्वर महास्वामीजींच्या कृपाशीर्वादाने आध्यात्मिक अभ्यासक, निरूपणकार प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी यांचे दररोज सायंकाळी 5 ते 6 या वेळेत प्रवचन सुरू आहे. निरूपणात स्वामीनाथ कलशेट्टी म्हणाले की, " अंत:करण शुद्धीसाठी वाईट कर्माचा त्याग करून योग्य कर्माचा निष्ठापूर्वक आचरण केल्यास मानवी जीवनाला सुख शांती लाभते.मानव सुख हवा असं म्हणतो परंतु सुख देणारे धर्माचरण करत नाही.पुण्य कर्म नाही केल्यास सुख कसे मिळणार? त्यासाठी दुसऱ्यांना निरपेक्षपणे मदत करणे याला पुण्य असे म्हणतात व दुसऱ्याला दुःख देणे याला पाप असे म्हणतात.म्हणून मनुष्याला सुख मिळवायची असेल तर मन,बुद्धी,चित्त व अहंकार शुद्ध असले पाहिजे.
पुढे असेही म्हणाले की, " आपले शरीर मळले तर साबण लावून स्वच्छ करतो परंतु मन मळले तर स्वच्छ करण्यासाठी सत्संगाची गरज आहे,असे प्रतिपादन केले.प्रवचनाचा शेवट गायक व तबला वादकांच्या महामंगलारतीने करण्यात येते.सदर प्रवचनाचा लाभ असंख्यभक्त घेत आहेत.