पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथील पंचायत समितीच्या कार्यालयात महाराष्ट्र शासन व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष्यमान भव योजनेचा उद्घाटन शुभारंभ पंढरपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले,नगर पालिका मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद माळी, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ.महेशकुमार माने,नागरी आरोग्य केंद्र च्या डॉ.सालविठ्ठल,सहायक गट विकास अधिकारी राजाराम भोंग,गट शिक्षण अधिकारी मारुती लिगाडे,विस्तार अधिकारी जावळे, डॉ.दिग्विजय केंदळे, डॉ.पंडित चव्हाण, डॉ.विशाल पाटील,डॉ. ऋचा सोनवणे,क्षयरोग उपचार वरिष्ठ पर्यवेक्षक एस एस शेख आदि उपस्थित होते.
यावेळी प्रशांत काळे म्हणाले की शासनाच्या वतीने विविध आरोग्य योजना सुरू झाल्या आहेत. त्या सर्व सामान्य माणसा पर्यंत योजना पोहोचवल्या पाहिजेत. आरोग्य विषयी जन जागृती झाली पाहिजे.
यावेळी डॉ.एकनाथ बोधले यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन आरोग्य सहाययक माणिक मस्के यांनी केले. यावेळी शहर व ग्रामीण भागातील आशा व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.