मंगळवेढा प्रतिनिधी
जवाहरलाल शेतकी हायस्कूल मंगळवेढा येथील विद्यार्थी प्रथमेश दिनेश होनमाने याचा कुर्डूवाडी येथे झालेल्या जिल्हा अंतर्गत शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये 68किलो गटांमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला आहे.
त्याचबरोबर निमगाव केतकी येथे झालेल्या अंतर विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये त्याचा द्वितीय क्रमांक आला आहे.
त्याच्या या यशाबद्दल मंगळवेढा येथील माजी नगरसेवक आप्पासाहेब चोपडे, संस्थेचे अध्यक्ष राहुल शहा, मुख्याध्यापक शंकर अवताडे, क्रीडा शिक्षक ढोबळे सर, संतोष दुधाळ ,स्वामी सर तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक वर्गातून त्याचे अभिनंदन होत आहे.