मुंबई प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर
सरस्वतीच्या दरबारात विद्यादानाचे पवित्र कार्य करणा-या भांडुप(पूर्व)येथील शिवाई विद्यामंदिरच्या वतीने नुकताच संस्कृत वाड्:मय मंडळ आयोजित संस्कृत प्रदर्शन हा सोहळा शाळेच्या संचालिका व अध्यक्षा मातृतुल्य गौरीताई भोईर यांनी दिलेल्या प्रोत्साहनाने व आशिर्वादाने उत्साहात यशस्वीपणे पार पडला.
शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन गोळे ,पर्यवेक्षक भालेराव ,ज्येष्ठ व श्रेष्ठ शिक्षक आणि शिक्षिका वृंद शाळेतील प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व लाडके विद्यार्थी,शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले शाळेचे माजी विद्यार्थी या सर्वांच्या सहकार्याने व्यवस्थितरित्या पार पडला.शाळेच्या संस्कृत शिक्षिका विद्या पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहाने व आनंदाने सर्वांनी काम करून संस्कृत प्रदर्शन आयोजित केले होते.
शिवाई विद्यामंदिर परिवाराच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात आल्याबद्दल संस्कृत वाड्:मय मंडळातर्फे सर्वांचे खूप खूप कौतुक व आभार मानण्यात आले.