सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालीका,जिल्हा क्रीडा कार्यालय,क्रीडा परिषद व बाँल बँडमिंटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा संकुल मैदानावर घेण्यात आलेल्या शहरस्तरीय बाँलबँडमिंटन स्पर्धेत नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेच्या १९ वर्षांखालील मुलींचा संघ उपविजेता ठरला.
अक्षरा सरवदे, साक्षी बेदरकर प्रणिती वडशेरला, रेखा भोसले, लक्ष्मी भोसले, स्वाती देवकर, प्रिया वडगावे, निकिता बाके, अंकिता गौडगाव व सौम्या बिराजदार या खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख विठ्ठल कुंभार, सूर्यकांत बिराजदार व अशोक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी खेळाडूंचे मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजयकुमार हुल्ले, मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे व शिक्षक वृंदानी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.