पंढरपूर प्रतिनिधी
शिवरत्न पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तु पासून अतिशय सुंदर असे प्रतिकृती तयार केल्या विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच टाकाऊ वस्तूचा उपयोग करता यावा त्यांचा योग्य वापर करता यावा याची सवय लागावी यासाठी टाकाऊ पासून टिकाऊ हा उपक्रम दरवर्षी विद्यालयांमध्ये राबवले जातात विद्यार्थ्यांना कागद कागदापासून वेगळे बॉक्स पासून वेगवेगळ्या प्रतिकृती करण्याचा आनंद घेता यावा यासाठी हा उपक्रम विद्यालयामध्ये राबवला जातो यामध्ये विद्यार्थ्यांनी भिंतीवरील आकर्षक वस्तू घराची प्रतिकृती वेगवेगळ्या प्रकारचे बंगले अशा पद्धतीने कला सादर करण्याचा प्रयत्न केला.
या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सहशिक्षक शितल मस्के, शितल बागल, वर्षा मोरे ,सीमा रकटे ,मोनाली गायकवाड ,मसरूद्दीन पटेल ,आदींनी मार्गदर्शन केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष गणपत मोरे यांनी सर्व विद्यार्थ्यांनचे आभीनंदन केले.