सोलापूर प्रतिनिधी
प्रदेश भारतीय जनता पार्टीच्यावतीने शिक्षक आघाडीच्या सोलापूर शहर -जिल्हा संयोजकपदी महेश घोंगडे यांची निवड करण्यात आली आहे.
नुकतेच पुणे येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आला.
पुणे येथे शिक्षक आघाडीचे बैठक झाली. याबैठकीत शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ.प्रशम कोल्हे, सरचिटणीस मोहन मुरलीधर, सचिव किरण पाटील, माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यासह शहर जिल्ह्यातील शिक्षक आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
निवडीबद्दल खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख,शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, जिल्हाध्यक्ष केदार, सोलापूर लोकसभा प्रचार समितीचे प्रमुख विक्रम देशमुख यांच्यासह पक्षातील अनेक नगरसेवकांनी अभिनंदन केले.महेश घोंगडे या धडाडीचे शिक्षक कार्यकर्ते असून शैक्षणिक कार्यासह सामाजिक कार्यात खूप मोठे योगदान आहे.देशसेवा करण्याची आवड असल्याने अनेक ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम, शैक्षणिक साहित्य वाटप, रक्तदान शिबीर, सण-उत्सव समारंभ, जयंती उत्सव, धार्मिक कार्यक्रम अशा विविध सामाजिक कार्यात हिरहिरीने सहभाग असतो.
त्यांच्या नियुक्तीने सर्वत्र कौतुक होत आहे. भारतीय जनता पक्षाच्यावतीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना मजबूत करुन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे घोंगडे यांनी सांगितले.