रोटरी क्लब,सोलापूर. व युनायटेड भावसार ऑर्गनायझेशन, सोलापूर.यांच्या विद्यमाने
सोलापूर प्रतिनिधी
युनायटेड भावसार ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष सिद्राम हंचाटे व रोटरी क्लब सोलापूर च्या अध्यक्ष डॉ ज्योती चिडगुपकर यांच्या हस्ते दि 16/09/2023 शनिवार रोजी राजेश कोठे इंग्लिश मीडियम स्कूल, हगलूर येथे हेल्थ चेकअप कॅम्प घेण्यात आला.
यावेळी 355 विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे हेल्थ चेकअप झाले त्याना आवश्यक आरोग्य साहित्य देण्यात आले स्टेज वर युबीओ सोलापूर चे अध्यक्ष सिद्राम हंचाटे व डॉ ज्योती चिडगुपकर,डॉ काबरा डॉ पाटील सचिव रवी लाडे , प्रकल्प समन्वयक लक्ष्मीकांत मुसळे व संचालक रविकिरण वायचळ आणि शाळेच्या मुख्याध्यापिका रणसुबे मॅडम व त्यांचा सर्व स्टाफ उपस्थित होते,
डॉ ज्योती चिडगूपकर यांनी आरोग्य विषयक विद्यार्थ्यांना टिप्स दिल्या डॉ काबरा यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना आरोग्य बाबत माहिती दिली युबो चे अध्यक्ष सिद्राम हंचाटे यांनी चांगले आरोग्य राहण्यासाठी योगासन, प्राणायाम यांचे महत्व पटवून दिले . रणसुभे मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.