तालुक्यातील दिव्यांगांनी अभियानाचा लाभ घ्यावा- गटविकास अधिकारी प्रशांत काळे
पंढरपूर प्रतिनिधी
दिव्यांगाना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच त्यांना अवश्यक असलेले दाखले काढण्यासाठी शासकीय कार्यालयात फेऱ्या माराव्या लागू नयेत यासाठी राज्यशासनाकडून दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी हे अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान सोलापूर जिल्ह्यात बुधवार दि. २० सप्टेंबर रोजी कर्मयोगी आप्पासाहेब कडादी, सांस्कृतिक सभागृह, श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना कुमठे, होडगी रोड सोलापूर येते पार पडणार आहे. या अभियानात तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी केले आहे.
दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी तसेत त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी राज्य शासनाच्या विविध योजना शासनामार्फत सुरु आहेत. विविध योजनांचा लाभ दिव्यांगांना घेण्यासाठी अवश्यक असलेले दाखले त्यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे त्यांना योजनेचा लाभ घेणे शक्य होत नाही. दिव्यांग व्यक्तींना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी राज्य शासनामार्फत दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी हे अभियान राबिवण्यात येत आहे. जिल्हा स्तरावर या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
यामध्ये दिव्यांगाच्या विविध योजनांची माहिती देणात येणार आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. या अभियानात पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील जस्तीत- जास्त दिव्यांग बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन गट विकास अधिकारी प्रशांत काळे यांनी केले आहे.