65 रक्तदात्याने केले रक्तदान, रक्तदानात महिलांचा उत्स्फुत सहभाग
पंढरपूर प्रतिनिधी
येथील श्री गणेश मित्र मंडळ गांधी रोड, पंढरपूर यांच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 65 जणांनी रक्तदान केले.
शहरातील मध्यवस्ती असलेल्या श्री गणेश मित्र मंडळ गांधी रोडचा राजा मंडळ सामाजिक उपक्रम करण्यात आग्रेसर असणारे मंडळ आहे. या मंडळाकडून निरनिराळे समाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये वृक्षा रोपन, रक्तदान शिबीर, अन्नदान यासह विसर्जन मिरवणूकीत समाजात जनजागृती करणारे देखावे सादर करून जनजागृती करण्यात येते. मंडळाच्यावतीने 23 सप्टेंबर रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 10 वाजता गांधी रोडचा राजा गणपतीचे पूजन करून रक्तदान शिबीरास प्रारंभ करण्यात आला. यावेळी 65 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये महिलांनीही उत्स्फुत सहभाग घेतला. रक्तदान शिबीरास युवा नेते प्रणव परिचारक, टायगर ग्रुप उपाध्यक्ष भैय्यासाहेब बंडगर यांनी भेट दिली. रक्तदान करणार्या रक्तदात्यास रक्तदानाचे प्रमाणपत्र व गांधीरोडचा राजा गणेशाची प्रतिमा भेट देण्यात आली. रक्तदान शिबीर दादा थिटे, अमित लाडे, संतोष बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष हर्षद थिटे, उपाध्यक्ष सचिन पालसांडे, सचिव श्रेयश लाडे, खजिनदार अभिषेक गावडे, कार्यध्यक्ष शुभम कमले, मंडळाचे सदस्य शेखर बंडगर, सनी थिटे यांच्यासह मंडळातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.
तसेच मंडळाच्या वतीने 25 सप्टेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविक भक्तांनी महाप्रसाद व गांधीरोडचा राजा गणेश दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गणेश मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.