भारतरत्न लता मंगेशकर यांचा जीवनपट उलघडत अप्रतिम गाण्यांची मैफल रंगली
पंढरपूर प्रतिनिधी
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या आणि सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके साहेब, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या पाचव्या दिवसाचे संगीत पुष्प ख्यातनाम गायिका मनिषा निश्चल आणि मालविका दिक्षित यांच्या "भावलता"लतादीदींनी अजरामर केलेल्या स्वरांनी गुंफले गेले.
सुरुवातीला मंदिर समिती सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळगावकर,सदस्या शकुंतला नडगिरे , मनिषा निश्चल, मालविका दिक्षित निवेदक रवींद्र खरे,निश्चल लताड, यांच्या शुभहस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.
सुरुवातीला मोगरा फुलला, सुंदर ते ध्यान,श्रावणात घन निळा,निळ्या आभाळी,धूंद मधुमती, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या,वादळ वारं सुटलं र्,लटपट लटपट,आज गोकुळात रंग खेळतो हरी,या चिमण्यांनो परत फिरारे,अखेरचा हा तुला दंडवत या सुंदर अशा गाण्यांनी भावलता या सुमधुर संगीत मैफिलीची सांगता केली, या सुंदर अशा भावलता कार्यक्रमाला तितकेच सुंदर निवेदन रविंद्र खरे यांनी करत भारतरत्न लता मंगेशकर यांचा जीवनपट उलघडला, अतिशय अभ्यासपूर्ण निवेदन केले,श.ऋषिकेश कुलट,(तबला)अंबरीश जाहगीरदार, (कीबोर्ड) संतोष कुलट (हार्मोनियम) सचिन वाघमारे (बासरी) रमेश कारले यांनी (ऑक्टोपॅड) संगीत संयोजन निश्चल लताड यांनी सुंदर करत पंढरपूर कला रसिकांना लतादीदींच्या भावविश्वात नेलं.अतिशय सुंदर संगीत महोत्सवाच आयोजन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती करतंय यांचा सर्वांना आनंद वाटत आहे,असेच सर्व प्रकारच्या कार्यक्रमाच आयोजन करत रहाव आणि कलारसिकांना आनंद द्यावा अशी भावना सर्वं कलारसिकांनी व्यक्त केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कर्मचारी वर्ग अधिक परिश्रम घेत आहेत.तसेच अमोल निसळ आणि ज्ञानेश्वरी गाडगे यांच्या ही कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.